ऐवज : अमोल पालेकर यांच्या View Finder चा स्मृतिबंध

This book is the biography of legendary Indian actor, filmmaker and theatre personality Amol Palekar. Originally written in Marathi, the book offers an insightful account of his life, artistic journey and contribution to Indian cinema and theatre. It has also been translated into English under the title View Finder.
ऐवज, अमोल पालेकर, या एका संवेदनशील व्यक्तीचं आत्मचरित्र/ एक स्मृतिबंध, अमोल पालेकर म्हणलं की, १९७९ चा ऋषीकेश मुखर्जी दिग्दर्शीत ‘गोलमाल’ हा हिंदी चित्रपट आठवतो; श्रोत्यांना मनमोकळं हसवणार्या राम आणि श्याम या दुहेरी व्यक्तीरेखा साकारणारा अमोल पालेकर. यांच्या निरागस आणि सहज अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.याच चित्रपटाने त्यांची देशभर ओळख निर्माण केली.
पण अमोल पालेकर यांनी गोलमालच्या यशा नंतर हुरळून न जाता संयम राखत, वेगवेगळ्या धाटणीच्या व्यक्तीरेखांचा शोध घेतला.गोलमाल सारख्या विनोदी भूमिका असलेले अनेक चित्रपट नाकारले आणि पैस्यांनी भरलेल्या सुटकेस, निर्मात्यांना जड हाताने वापस नेवा लागल्या; कारण त्यांना त्याच-त्याच भूमिका करायच्या नव्हत्या आणि सुपरस्टार ही व्हायचे नव्हते.
जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी.आर्टची पदवी मिळवणारे, अमोल पालेकर यांचा नाटक-चित्रपट या क्षेत्रात अपघाताने प्रवास सुरू होतो, तो १९६७ चे हिंदी नाटक ‘चूप! कोर्ट चालू है’ आणि १९७१ ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटापासून.या दुहेरी क्षेत्रातील प्रवास मात्र एका समान धाग्यातून होतो, तो म्हणजे या दोन्हीचा दिग्दर्शक ‘सत्यदेव दुबे’ यांच्या पासून.अमोल पालेकर त्यांना गुरू मानतात तर मैत्रीचे सर्व अधिकार सत्यदेव दुबे यांनी त्यांना बहाल केले होते..!
बर्गमन, कुरोसावा, गोदाई, त्रुफॉ आणि आयझेनस्टाइन सारख्या दिग्दर्शकांडून प्रेरणा घेऊन, दिग्दर्शक म्हणून स्वभाषेत- मातृभाषेत चित्रपट बनवण्याचे निश्चित केलं.आणि त्यातून १९८० चा ‘आक्रीत’ हा मराठी चित्रपट बनला.जोकी, ‘संत तुकाराम’ या चित्रपटा नंतर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.हा चित्रपट १९७२ ते १९७४ ‘मानवत खून खटला’, देशाला हादरवणार्या घटनेवर बेतलेला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन- निर्मिती त्यांनी केली असून अभिनय ही केला आहे. ‘उत्तमराव बाराहते’ ही व्यक्तीरेखा पार पाडण्यासाठी त्यांनी १०/१२ किलो वजन वाढवलं होतं आणि चित्रपट पूर्ण झाल्यावर घटवलं ही होतं; कारण इतर चित्रपटातील कंटिन्युटी….
जेंव्हा अमोल पालेकर, ऋषीकेश मुखर्जी यांना मनातलं सांगतात की, त्यांना दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवायचे आहेत.तेंव्हा ऋषीदा, त्यांना आशिर्वादाच्या स्वरूपात ‘director’s viewfinder’ देतात आणि त्याच क्षणी त्यांचे डोळे पाणवतात.ऋषीदांच्या ‘मुसाफिर’ या पहिल्या चित्रपटाआधी बिमलदांकडून हाच व्ह्युफाइंडर ऋषीदांना मिळाला होता.
पहिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळविणाऱ्या अभिनेत्याला मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये “सुपर स्टार” म्हणून सहज ख्याती मिळवणे अजीबात अवघड नव्हतं; परंतु त्यांनी हेतूपुरस्सर ते नाकारलं.नावाच्या आणि पैशाच्या मागं न लागता, त्यांनी स्व:पना जपत, समांतर चित्रपट- नाटकं करत राहिले; त्यात प्रायोगिक- सर्जनशीपणे काम करत गेले, यश-अपयश पचवीत यशस्वी ही झाले…
त्यांच्या ‘भुमिका’ या चित्रपटाचा एक किस्सा त्यांनी सांगिला आहे…की, स्मिता पाटीलला न सांगता अचानक चापट मारून एक दृष्य घेऊया, पण अमोल पालेकर ते नाकारतात.दिग्दर्शक या नात्याने श्याम बेनेगल ऑर्डर देतात.ॲक्शन होतं, अमोल पालेकर धडधडत्या काळजानं स्मिता पाटीलला अचानक चापट मारतात, तीचे हावभाव दिग्दर्शकाला जसे अपेक्षित असतात तसे मिळतात.कट होतो, टाळा वाजतात आणि दोषी भावनेने खजील होऊन उभा असलेले अमोल पालेकर स्मिता पाटीलकडे पाहतात आणि दोघं भरल्या डोळ्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडतात.ही संवेदनशीलता..!
( हा किस्सा आणि या पुस्तका विषयी lallantop cinema या युट्यूबवर चॅनल वर अमोल पालेकर यांची सविस्तर मुलाकात आहे.)-https://youtu.be/18JgagLh-MA
पहिल्या पत्नीला आपलं सर्वस्व देऊन, जुहू मधला मुख्य धारेतील स्टार्सच्या बंगल्यांच्या रांगेतील ‘चिरेबंदी’ बंगला ही. माया नगरी- मुंबई सोडून, पुणे येथे नव्याने दुसर्या आयुष्याची यशस्वी सुरुवात केली…
एक संवेदनशील कलाकार म्हणून त्यांनी अनेक कलाकृतींची निर्मिती केली, अनेक कलाकारांना मदत केली; अनेक नव्या चहर्यांना संधी दिली.तसच एक संवेदनशील माणूस म्हणून ही त्यांनी निसर्गाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध बाबा आढाव, नसीरुद्दीन शहा यांच्या समवेत केला- मोर्चा काढला, राहुल गांधीच्या ‘भारत जोडो यात्रा’-२०२२ यात्रेत सहभागी होऊन, आपले मत मांडले.
प्रख्यात निर्माता बी.आर.चोप्रा, अमोल पालेकर यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच एका फिल्मचे मानधनाचे पैसे न देता, उलट चित्रपट इंडस्ट्रीच्या बाहेर फेकण्याची धमकी देतात… नंतर; अमोल पालेकर त्यांना त्याच्या तोंडावर उत्तर देवून, न्यायालयातून आपला हक्क मिळवून, तो पैसा संस्थेला दान करतात.
सावरकर यांच्यावर चित्रपट करताना, त्यांनी, “एकांगी, प्रचारकी, तारस्वरातला चित्रपट बनवण्यामध्ये मला रस नाही हेही ठामपणे सांगितले.” चित्रपट नाकारला.
१९८५ च्या विधानसभा निवडणुकीचे तिकिट, राजीव गांधी यांच्या काळात कॉंग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांकडून ही नम्रतेने नाकारले.
ऑस्करसाठी भारतीय चित्रपटाची निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष ते होते.त्यांनी चैतन्य ताम्हाणे यांचा मराठी चित्रपट ‘कोर्ट’ हा बहुमताने निवडला होता; परंतु बॉलिवूडच्या एका मोठ्या लॉबीने पक्षपाताचे आरोप करून, दुसरा मुख्य धारेतला बेचव चित्रपट निवडण्याचा दबाव टाकला होता.परंतु त्याला न जुमानता, समिती बहुमताने त्यांच्या निर्णयावर ठाम राहिली.
‘२०० हल्ला हो’ २०२१ चा ott चित्रपट होय, यात त्यांनी एका निवृत्त न्यायाधीशाचं पात्र निभावलं आहे.त्याला जेंव्हा होणाऱ्या आणि झालेल्या अन्यायाला न्याय देण्यास असमर्थ असल्याची जाणीव होते.जेंव्हा तो मनात कोंडलेला-दाटलेला हुंदका मोकळा करतो तेंव्हा त्यांच्यातल्या अभिनयाची ताकत दिसून देते…
‘ऐवज’ हा स्मृतिबंध अमोल पालेकर यांनी “विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सगळ्यांना” समर्पित केला आहे…
अमोल पालेकर त्यांच्या या पुस्तकात म्हणतात, “कलेच्या तीन क्षेत्रांमध्ये, पन्नास वर्षं, घवघवीत आणि यशस्वी काम करूनही ‘कलाकार अमोल पालेकर’ला एकही सरकारी पुरस्कार मिळत नाही, यातच ‘बंडखोर अमोल पालेकर’ यशस्वी झालेला असतो.”
त्यांनी नाटक-चित्रपट-टेलिव्हिजन तसेच आजच्या ott वरही काम केलं आहे. त्यांच्या अनेक नाटकांना-चित्रपटांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले परंतु भारत किंवा महाराष्ट्र सरकारने अद्यापही कोणताही सरकारी पुरस्कार त्यांना दिला नाही… ही खदखद नक्कीच या सच्या व अस्सल कलाकाराला आहे; परंतु आज वयाच्या ८० वर्षा नंतरही त्याच जिद्दीने कलाकाराचा धर्म निभवताना दिसत आहेत…! आणि शेवटची ईच्छा सुध्दा लिहून ठेवली आहे…!
एका संवेदनशील व्यक्तीने, एका सर्जनशील कलाकाराने ऐवज- एक स्मृतिबंध त्यांच्या मातृभाषेत- मराठीत लिहिला असून इंग्रजीत Viewfinder : A Memoir या नावाने भाषांतरीत केला आहे.-https://amzn.in/d/41AqhAA
अभिनेता म्हणून त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, मल्याळी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनेक चित्रपट- नाटकं केली आहेत.एक दिग्दर्शक म्हणून १९८० ते २०१३ या काळात त्यांनी वरील भाषेत १६ चित्रपट, ०५ टेलिव्हिजन मालिका, एक माहितीपट व अनेक नाटकं केली आहेत…
त्यांची दिग्दर्शन व अभिनय केलेले काही
नाटके-
चुप कोर्ट चालू है, आधे अधूरे, पगला घोडा, अवध्य, ह्यवदन, गोची, वासनाकांड, जुलूस, मुखवटे, राशोमान, नागमंडल आणि कुसूर इ…
चित्रपट मराठी- हिंदी
शांतता कोर्ट चालू आहे, चितचोर, भूमिका, घरोंदा, अंकुश, गोलमाल, आक्रीत, आंचल, नरम गरम, आदमी और औरत, तरंग, अनकही, झुठी, थोडासा रूमानी हो जाय, दायरा, कैरी, अनाहत, पहेली, थांग, Quest, दुमकटा, समांतर, And Once Again, धूसर, २०० हल्ला हो इ…
वाराणसी येथे शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन गुंतवणूक करणारा सदीचा महानायका का वास्तवातला हा नायक….?
अमोल पालेकर म्हणतात, गोलमाल नंतर, मी फक्त साइनींग अमाऊंट जरी घेऊन ठेवल्या असत्या तरीही माझ्या पाच पिढ्यांनी बसून खाल्लं असतं…

ऐवज Link- https://amzn.in/d/2S5Mtgp
View Finder Link- https://amzn.in/d/41AqhAA
https://udaypeeth.com/ए-के-हंगल/