कांबळे फक्त कण्हला नाही, ढसा-ढसा रडला

कांबळे फक्त कनला नाही, ढसा-ढसा रडला

कांबळे फक्त कण्हला नाही, ढसा-ढसा रडला

कांबळे आता हैराण झाला

कांबळेच कांबळेला कांबळ्या मनू लागला

कांबळेच कांबळेची औकात काढू लागला

कांबळेच कांबळेला छळू लागला

कांबळेच कांबळेला झोंबू आणि हिणवू लागला

 

कांबळेच कांबळेला गद्दार म्हणू लागला

कांबळेच कांबळेची जात काढू लागला

कांबळेच कांबळेचा बाप काढू लागला

कांबळेच कांबळेला शिव्या देवू लागला

कांबळेच कांबळेला बेदम मारू लागला

 

कांबळे फक्त कण्हला नाही, ढासाढसा रडला आणि आठवू लागला…

 

महामानवाच्या जाती अंताच्या लढाईला

कांबळेने कांबळेच्या हातात हात देऊन

मैदानात उडी घेऊन डरकाळी फोडली होती

दोघांनी मिळून अन्यायाविरुद्ध हाबूक ठोकला होता

जातिवाद्यांना भिम टोला दिला होता

आणि जेल ही भोगला होता

 

शाहू-फुले-आंबेडकर जयंती उत्सवात

जाती निर्मूलनाची पोटतिडकीनं भाषणं दिली होती

कविता लिहिल्या होत्या

गाणी गायली होती

 

हे आठवून कांबळेच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबेना

शेवटी कांबळे आंधळा झाला

त्यो मोठ-मोठ्यानं हासू लागला

कारण त्याला सोशल मीडिया बघता येणार नव्हता

आता त्यो भैरा होण्याचा मार्ग शोधत आहे…

 कांबळे फक्त कण्हला नाही, ढसा-ढसा रडला

                                                     – एल.सतीश

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top