नॉट गॉन विथ द विंड – साहित्यावरील चित्रपटांचा मागोवा
This book is written by an IAS officer and a great Marathi writer Vishwas Patil.He also awarded by the Sahitya Akademi Award in 1992.

लेखक विश्वास पाटील हे नाव घेतलं की आपल्याला पानिपत, संभाजी आणि महानायक सारखे ऐतिहासिक ग्रंथ आठवतात.परंतु त्यांनी ‘नॉट गॉन विथ द विंड’ हे पुस्तक, जगभरात गाजलेले साहित्य आणि त्यावरील चित्रपट हा सार घेवून लिहिलेले. साहित्य व त्याचा लेखक आणि त्यावरील चित्रपट. प्रामुख्याने या तीन गोष्टींवरती त्यांनी फोकस केलेले आहे. हे त्यांनी केलेला प्रचंड अभ्यास आणि प्रत्यक्ष घेतलेला अनुभवामुळे वाचण्यास प्रेरित करतं!
नॉट गॉन विथ द विंड
हे पुस्तक त्यांनी भारताचा आजचा श्रेष्ठ कॅमेरामन असा उल्लेख करून “बिनोद प्रधान आणि त्याचा कॅमेरा” ह्या दोघांना व त्यांच्या सहवासातील सुखद क्षणांना अर्पण केलेले आहे.
नॉट गॉन विथ द विंड या पुस्तकात लेखकाने ‘गॉन विथ द विंड ‘ॲना कारनिना’, ‘द ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय’, ‘द गॉडफादर’, ‘द ब्लू एंजेल’, ‘स्पार्टाकस’ तसेच भारतातील ‘मदर इंडिया’ ते ‘लगान’ व आपला मराठमोळा ‘पिंजरा’ पर्यंत, विश्वास पाटील यांनी नेमक्या शब्दात मार्मिक विवरण कलेले आहे.
वरील कलाकृतींवर हॉलीवूड पासून ते बॉलीवूड पर्यंत चित्रपट निर्मात्यांना त्यावर चित्रपट बनविण्याचा मोह झालेला आणि तो होणे साहजिकच आहे.
पिरे बाऊल या फ्रेंच कादंबरीकाराने ‘द ब्रिज ऑन द रिवर क्वॉय’ ही फ्रेंच कादंबरी लिहिली.ती खूप गाजली. या कादंबरीवर याच नावाने ‘डेव्हिड लीन’ या श्रेष्ठ दिग्दर्शकाने ज्याला स्पिलबर्गसारखा आजचा जगविख्यात दिग्दर्शकही गुरू मानतो, त्याने अती कष्टाने चित्रपट बनवला आणि त्याला चक्क २८ ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. या कादंबरीत जपान मधील ‘क्वॉय’ नावाच्या नदीवर जपानी सैनिक हिंदी आणि ब्रिटिश सैनिकांकडून (गुलामांकडून) लोह मार्गासाठी एक पूल बांधायचा असतो. तो पूल कसा बांधला जातो व पाडला जातो वगैरे. या लोह मार्गासाठी जवळजवळ १६ हजार हिंदी सैन्य व नागरिक मारले गेलेले आहेत तसेच महानायक या पुस्तकाच्या संशोधना वेळेस विश्वास पाटील सर स्वतः त्या घटणास्थळी गेले होते कारण सदर पुलावरुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रवास केलेला होता.
पर्ल बक या अमेरिकन लेखिकाने ‘द गुड अर्थ’ ही कादंबरी लिहिली व तीला १९३२ चे ‘पुलित्झर’ हे सर्व श्रेष्ठ पारितोषिक मिळाले. त्यावर चित्रपटही बनला व गाजला. या कादंबरीत ‘वँग लॉंग’ नावाच्या चिनी शेतकर्याची करुण कहाणी आहे. १९३७ मध्ये ‘द गुड अर्थ’ रिलीज झाला व भारतात १९४० मध्ये महेबुब खान या दिग्दर्शकाने पाहिला व ते खूप प्रभावित झाले; या व अशाच प्रकारच्या कथेवर चित्रपट करायचा असे ठरले. ‘मदर’ नावाची याच लेखिकेने लिहिलेली कादंबरी नेही त्यांना प्रभावित केले व भारतीय संस्कार करून पटकथाकाराने तीची पटकथा लिहिली तसेच कै.बाबूराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ या चित्रपटातील ‘चिकटे सावकार’ या पासून प्रभावित होऊन सुखीलाल हा खलनायक रंगवला व १९४० मध्येच त्यांनी ‘औरत’ हा चित्रपट बनवला व १९५७ ला याच कथानकावर ‘मदर इंडिया’ हा भारतीय चित्रपटातील माईलस्टोन चित्रपट बनवला. त्याचे ऑस्कर साठी ‘सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट’ साठी पाच चित्रपटात नामांकन झाले.
१४ एप्रिल १९७२ रोजी शांताराम बापुचा ‘पिंजरा’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांना प्रथमच चित्रपटग्रहामध्ये चांगलेच खेचले होते. या चित्रपटाचे बीज मात्र १९०५ मध्ये जर्मन देशात जन्मले होते असे विश्वास पाटील लिहितात. हेन्री मान या जर्मन लेखकाने ‘प्रोफेसर वूनरंट’ ही कादंबरी १९०५ ला लिहिली व ती खूप गाजली व या कादंबरीवर हॉलीवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक जोसेफ वॉन स्टर्नबर्ग यांनी १९३० मध्ये ‘द ब्लू एंजल’ हा चित्रपट जर्मन व इंग्रजी भाषेत निर्माण केला. तो सर्वत्र गाजला.
ऑथेल्लो या शेक्सपिअरच्या नाटकांवर बनलेले चित्रपट व ज्यांनी त्या भूमिकेला न्याय दिला; त्यांच्या विषयी ते सविस्तर लिहितात. भारतात मात्र या भूमिकेला न्याय फक्त ‘अमिताभ बच्चन’च देवू शकतात असे ही लेखक म्हणतात.
तसेच टॉलस्टॉय यांची जगज्जेती ‘ॲना कारनिना’ या कादंबरीतील ॲना च्या भूमिकेचे सोने स्मिता पाटील यांनी केले असते असेही ते म्हणतात.
लेखक मुघल-ए-आझम विषयी भरभरून लिहितात- “कथा आणि दंतकथा, इतिहास आणि कल्पित या सार्यांच्या बेमालूम मिश्रणातून के.असिफने दुनियेला ‘मुघल-ए-आझम’ या नावाच्या एका अभिजात कलाकृतीची एक अनमोल देणगी दिलेली आहे.”
लेखक विश्वास पाटील या पुस्तकात लेखक, दिग्दर्शक व त्यातील कलाकार निर्माते व तंत्रज्ञ तसेच त्या काळातील परिस्थिती, आजची परिस्थिती याचाही मागोवा घेतात.
एकंदरीत पाहता ‘नॉट गॉन विथ द विंड’ हे पुस्तक चित्रपट विद्यार्थी, रसिक, अभ्यासक, कलाकार, तंत्रज्ञ, व निर्माता इत्यादींनी वाचून, संग्रही ठेवण्या सारखेच आहे.
https://amzn.in/d/5Wk3XUZ Book Link