जिगीषा नाट्य सहवास – २०२६
छत्रपती संभाजीनगरात २१ ते २३ ऑगस्टदरम्यान २०२६

हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन यांच्या आयोजनातून होणाऱ्या या महोत्सवात नाट्यप्रयोग, परिसंवाद, प्रकट मुलाखती, अभिवाचन, नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे.
पहिला दिवस
पहिल्या दिवशी- नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शन, नाट्य सहवास उद्धाटन सोहळा आणि ‘हॅनाची सुटकेस ‘ हे नाटक
महोत्सवाची सुरुवात रोजी नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाने होणार आहे.
वार– शुक्रवारी
दिनांक – २१ ऑगस्ट
वेळ- सायंकाळी ५ वाजता
ठिकाण– रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर येथे
या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. बाबा भांड यांच्या हस्ते होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते नाट्य सहवास उद्घाटन सोहळा होणार आहे.
रात्री ७.३० वाजता
हॅनाची सुटकेस या नाटकाचा प्रयोग होणार आहे. विनामूल्य
ठिकाण: रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर.
तसेच
जिगीषा खुली एकांकिका स्पर्धा २०२६- अंतिम फेरी
‘जिगीषा खुली एकांकिका स्पर्धा २०२६’
‘जिगीषा नाट्य सहवास २०२६’ च्या निमित्ताने मराठवाड्यातील रंगकर्मींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिगीषा खुली एकांकिका स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथे झाल्या आहेत अंतिम फेरी २१ ऑगस्ट २०२६ रोजीच रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक २१ हजार रुपये आहे.
याशिवाय लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत या विभागांसाठी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी- प्रकट मुलाखत, परिसंवाद आणि ‘सवाल जवाब ‘ हे नाटक
दुसऱ्या दिवशी प्रकट मुलाखत आणि परिसंवाद
वार– शनिवार, २२ ऑगस्ट
वेळ– सकाळी ११ वाजता
ठिकाण– आयनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर
येथे प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांची प्रकट मुलाखत होणार आहे. प्रतिक्षा लोणकर आणि चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दुपारी ४ वाजता
साहित्य ते नाटक : माध्यम रूपांतर या विषयावर परिसंवाद आहे. या परिसंवादात अतुल पेठे, बालाजी सुतार आणि आसाराम लोमटे सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता
सवाल-जवाब या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या प्रयोगासाठी देणगीमूल्य २००/१०० रुपये आहे.
ठिकाण: रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर. तिसरा दिवस
तिसऱ्या दिवशी- अजित दळवी यांची प्रकट मुलाखत, अभिवाचन आणि ‘बरड ‘ हे नाटक
वार- रविवार
दिनांक-२३ ऑगस्ट
वेळ- सकाळी ११ वाजता
ठिकाण- आयनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर येथे नाटककार प्रा.अजित दळवी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यांच्याशी मुस्तजीब खान आणि शिव कदम त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
दुपारी ४ वाजता
‘उमगलेले गांधी’ या अभिवाचन होणार आहे. या कार्यक्रमात रोहिणी हट्टंगडी, दीपक राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता ‘बरड’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या प्रयोगासाठी देणगीमूल्य २००/१०० रुपये आहे.
ठिकाण: रुक्मिणी नाट्यगृह, एमजीएम परिसर.
वरील तीन दिवसाचा कार्यक्रम सर्वांनसाठी मोफत आहे.पण दोन नाटकासाठी मात्र तिकीट खरेदी करावा लागेल, ज्यांची ऑनलाईन बुकिंग बुक माय शो वरती चालू आहे.खाली दोनी नाटकाची नावे आणि लिंक.
लिंक– १)सवाल-जवाब – https://in.bookmyshow.com/plays/sawal-jawab-jigisha-natyasahwas-2026/ET00511373
२)बरड – https://in.bookmyshow.com/plays/barad-jigisha-natyasahavas-2026/ET00511374